Shreya Maskar
क्रिस्पी आलू टिक्की बनवण्यासाठी उकडलेले बटाटे, ब्रेड क्रम्ब्स, कॉर्नफ्लोर, आलं, जिरे, लाल तिखट, हिरव्या मिरच्या, चाट मसाला, कोथिंबीर, आमचूर पावडर, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
क्रिस्पी आलू टिक्की बनवण्यासाठी बटाटे उकडून घ्या.
एका बाऊलमध्ये आलं, हिरवी मिरची, कॉर्नफ्लोर, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, चाट मसाला घालून छान मिक्स करा.
पुढे यात बारीक चिरलेली कोथिंबीर, आमचूर पावडर, ब्रेड क्रम्ब्स आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकजीव करा.
मसाल्यांमध्ये उकडलेल्या बटाटे मॅश करून टाका.
मिश्रणाचे छोटे गोळे करून छान टिक्की बनवून घ्या.
पॅनमध्ये तेल टाकून आलू टिक्की फ्राय करून घ्या.
पुदिन्याच्या चटणीसोबत क्रिस्पी आलू टिक्कीचा आस्वाद घ्या.