Shruti Vilas Kadam
जाड रवा मंद आचेवर कोरडा भाजून घ्या. रंग बदलू देऊ नका, फक्त सुगंध येईपर्यंत भाजा आणि थंड होऊ द्या.
भाजलेल्या रव्यात दही आणि थोडे पाणी घालून घट्टसर बॅटर तयार करा. गुठळ्या राहू देऊ नका.
कढईत तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ, चणा डाळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून फोडणी द्या.
तयार फोडणी रव्याच्या बॅटरमध्ये घाला. मीठ चवीनुसार घालून नीट मिसळा.
ईडली करण्याआधी भिजवणात इनो (फ्रूट सॉल्ट) किंवा चिमूटभर बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिसळा.
इडलीच्या साच्यात मिश्रण ओता आणि वाफेवर १०–१२ मिनिटे शिजवा.
रवा इडली नारळाची चटणी आणि सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा.