Manasvi Choudhary
दूध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. आपल्यापैकी अनेकांना सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय असते.
दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम ही पोषक घटके असतात. रात्री दूध प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक कप कोमट दूध प्यायलात तर पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असते यामुळे रात्री दूध प्यायल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो मूड फ्रेश राहतो.
दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्यामुळे रात्री दूध पिण्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
कोमट दूध प्यायल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे रात्री उशिरा वारंवार खाण्याची इच्छा होत नाही.