Shreya Maskar
दापोली हा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. 'दापोली'ला कोकण प्रदेशातील 'मिनी-महाबळेश्वर' म्हणून प्रसिद्ध आहे. येथे अनेक सुंदर धबधबे आहेत.
चंद्रनगर धबधबा लाडघर जवळ आहे. धो धो कोसळणारा हा धबधबा सकाळच्या वेळी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवण्यासाठी किंवा पाण्यात मनसोक्त खेळण्यासाठी उत्तम आहे.
आसूद गावात आसूद धबधबा वसलेला आहे.ऐतिहासिक केशवराज मंदिराच्या जवळून वाहणारा हा धबधबा खडकांवर कोरलेल्या रचनांवरून स्फटिकासारखे स्वच्छ पाणी खाली कोसळताना दिसतो.
ब्राह्मणवाडी गावाजवळ बोरघर धबधबा आहे. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जंगलातील घनदाट वाटांमधून प्रवास करावा लागतो.
परशुराम धबधबा हा पावसाळ्यात हिरव्यागार वनराईने वेढलेला आहे. हा धबधबा करंजणी येथे आहे.
कोंडी धबधबा हा बोरीवली गावाच्या पायथ्याशी स्थित आहे. मुसळधार पावसात हा धबधबा ओसांडून वाहतो. खडकांच्या आकर्षक रचनांवरून पाण्याचा प्रचंड प्रवाह खाली कोसळतो.
दापोलीजवळ सावतसडा धबधबा आहे. पावसाळ्यात जोरदार पाऊस पडताना याचे स्वरूप अत्यंत भव्य होते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.