Shreya Maskar
श्रावणात उपवासाला टिफिनसाठी रताळ्याची भाजी बनवा.
रताळ्याची भाजी बनवण्यासाठी रताळे, तेल, जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, आले, शेंगदाणे, मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
रताळ्याची भाजी बनवण्यासाठी रताळे उकडून साल सोलून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि आलं घालून फोडणी करा.
फोडणीमध्ये शेंगदाणे, मीठ, हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि गरम मसाला घाला.
फोडणीत रताळ्याचे काप घालून चांगले परतून घ्या.
रताळ्याची भाजीवरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घाला.
रताळ्याची भाजी तुम्ही दहीसोबत खाऊ शकता.