Shreya Maskar
उपवासाला आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे रताळ्याचा किस
रताळ्याचा किस कसा बनवावा, सिंपल रेसिपी आताच जाणून घेऊयात.
रताळ्याचा खमंग किस बनवण्यासाठी रताळी, तूप, हिरव्या मिरच्या, मीठ, लाल तिखट, दाण्याचा कूट आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
रताळ्याचा किस बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून किसून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, लाल तिखट, जिरे टाकून मिक्स करा.
फोडणी तडतडल्यावरवर त्यात रताळ्याचा किस टाकून खरपूस भाजून घ्या.
यात चवीनुसार मीठ, दाण्याचा कूट आणि साखर मिक्स करा.
दह्यासोबत तुम्ही रताळ्याच्या खमंग किसचा आस्वाद घ्या.