Shruti Vilas Kadam
दूध उकळून त्यात लिंबाचा रस घालून फाडा. त्यातून छेना वेगळा करून पाणी काढून घ्या.
छेना हाताने चांगला मळून गुळगुळीत करा, जेणेकरून गोळे मऊ होतील.
छोटे गोल किंवा चपटे गोळे बनवा आणि बाजूला ठेवा.
पाण्यात साखर घालून उकळा आणि त्यात हे गोळे शिजवा.
दूध आटवून त्यात साखर, वेलची आणि केशर घालून रबडी बनवा.
शिजलेले गोळे हलकेच दाबून रबडीत टाका, जेणेकरून ते रस शोषून घेतील.
फ्रिजमध्ये थंड करून ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा.