Siddhi Hande
साउथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आज लग्नबंधनात अडकणार आहे.
विजय आणि रश्मिकाच्या नात्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. दरम्यान, आता त्यांनी नात्याची कबुली दिली आहे.
विजय आणि रश्मिका हे दोघेही उत्तम कलाकार आहे. दोघांनी एकत्र काम केले आहे.
विजय देवरकोंडा आणि रश्मिकाचा पहिला चित्रपट हा गीता गोविंदम होता. २०१७मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
विजय आणि रश्मिकाची जोडी गीता गोविंदम चित्रपटाच्या सेटवर जुळली असल्याचे सांगितले जात आहे.
गीता गोविंदम चित्रपटात त्यांनी खूप सुंदर अभिनय केला होता. यामुळेच चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली.
यानंतर २०१९ मध्ये त्यांनी डिअर कॉम्रेड चित्रपटात काम केले आहे. यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती.
विजय आणि रश्मिका एकत्र खूप सुंदर दिसतात. ते दोघेही एकमेकांसोबत खूप सुंदर आणि नॅचरल अभिनय करतात.
विजय आणि रश्मिकाचा लग्नसोहळा उदयपुर येथे होणार आहे. त्यांची काल हळद होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Next: रश्मिका मंदाना कि विजय देवरकोंडा कोण आहे अधिक श्रीमंत, वाचा दोघांची संपत्ती