Manasvi Choudhary
बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री रश्मिका मंदानाचा काही दिवसापूर्वीच विवाह पार पडला.
अभिनेत्री रश्मिका मंदानाने साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत लग्नगाठ बांधली आहे.
या दोघांनीही लग्नामध्ये अस्सल पारंपारिक साऊथ इंडियन स्टाईल करत सर्वांचीच मने जिंकली.
अशातच आता अभिनेत्री रश्मिकाच्या मंगळसूत्राची चर्चा सुरू आहे. या अनोख्या डिझाईनच्या मंगळसूत्राबाबत सर्वत्र सर्च केले जात आहे.
तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, रश्मिकाचं मंगळसूत्र युनिक आहे. सिंपल डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र खास बनवून घेतलं आहे.
मंगळसूत्राची डिझाईन आकर्षक असली तरी या मंगळसूत्राचे वैशिष्ट्य म्हणजे रश्मिका तेलुगूची असल्याने तेलुगू आणि विजय देवरकोंडाच्या कोडवा परंपरेचा संगंम दिसत आहे.
रश्मिकाच्या मंगळसूत्रात सोन्याच्या बारीक चैनमध्ये एका बाजूला काळे मणी गुंफलेले आहेत मंगळसूत्राच्या मध्यभागी सोन्याचे 'लक्ष्मी' पदक आहे, जे समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. म्हणून हे मंगळसूत्र सध्या चर्चेत राहिलं आहे.
नाजूक आणि तितकच स्टायलिश असं हे मंगळसूत्र असल्याने महिलाचं आकर्षण बनलं आहे.