Rashmika Mandanna: गळ्याच हिऱ्यांचा हार अन् चेहऱ्यावर ग्लो...; श्रीवल्लीचा ग्लॅमरस लूक व्हायरल, पाहा फोटो

Shruti Vilas Kadam

रश्मिका मंदान्ना

रश्मिका मंदान्ना नुकतीच लॉस एंजेलिसमधील लक्झरी ज्वेलरी ब्रँड स्वारोवस्कीच्या १३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘Masters of Light’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. रश्मिकाने या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले.

Rashmika mandanna

भारताची ब्रँड अॅम्बेसेडर


रश्मिका ही स्वारोवस्की या जागतिक ज्वेलरी ब्रँडची भारतासाठीची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे तिने पहिल्यांदाच या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेतला.

Rashmika mandanna

गौरव गुप्ता डिझाइनर ड्रेस


रश्मिकाने भारतीय डिझायनर गौरव गुप्ता यांच्या “Holiday 2026” कलेक्शनमधील ब्लॅक आणि सिल्व्हर टोनचा सुंदर कॉर्सेट गाऊन परिधान केला होता. हा तिच्या लूकचा मुख्य आकर्षण होता.

Rashmika mandanna

स्वारोवस्कीच्या दागिन्यांनी सजलेला लूक


तिच्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने Swarovski Millennia चोकर नेकलेस, मोठे ऑक्टॅगन-कट इअर कफ्स आणि इतर क्रिस्टल ज्वेलरी वापरली होती, ज्यामुळे ती अधिकच चमकदार दिसत होती.

Rashmika mandanna

परफेक्ट मेकअप आणि हेअरस्टाईल


रश्मिकाचा मेकअप न्यूड टोनमध्ये ठेवण्यात आला होता. सॉफ्ट स्मोकी आयज, ग्लोइंग स्किन आणि स्लीक हाफ-पोनी हेअरस्टाईलमुळे तिचा एलिगंट आणि रॉयल लूक उठून दिसला.

Rashmika mandanna

ग्लोबल स्टार्ससोबत रश्मिका


या इव्हेंटमध्ये काइली जेनर, चेर, मिशेल योहसारख्या ग्लोबल स्टार्ससोबत रश्मिकाने भारतीय सौंदर्याचा झगमगता ठसा उमटवला. तिच्या उपस्थितीची सर्वत्र चर्चा झाली.

Rashmika mandanna

सोशल मीडियावर व्हायरल फोटो


रश्मिकाचे या इव्हेंटमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या या ग्लॅमरस अवतारावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि ती फॅशन आयकॉन ठरली आहे.

Rashmika mandanna

नागिन फेम मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Mouni Roy
येथे क्लिक करा