Siddhi Hande
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.
रश्मिकाने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून चाहत्यांची मने जिंकली आहे. रश्मिकाने आतापर्यंत अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रश्मिकाने नुकतेच हिरव्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
रश्मिकाने केसांची सुंदर हेअरस्टाईल त्यात गुलाबाची फुले माळली होती.
या साडीवर तिने सुंदर पोटली बॅग घेतली होती. या पोटली बॅगवर आर एम (RM) असं लिहलं आहे.
रश्मिकाने हटके पोझ देत सुंदर फोटोशूट केले आहे.
रश्मिका केरळमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानिमित्त तिने हा स्पेशल लूक केला होता.
रश्मिकाला केरळमध्ये चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.