Rashi Bhavishya : वटपौर्णिमेचा दिवस 'या' राशींसाठी असेल सोन्यासारखा, तुमची रास?

Anjali Potdar

मेष

मेष राशीच्या लोकांना आज मनस्ताप आणि शारीरिक ताण त्रास होऊ शकतो. काम कितीही चांगले केले तरी हाती काहीही लागणार नाही.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आज जोडीदाराची ओढ वाटेल. अर्थात आज वटपौर्णिमेचा दिवस खास आहेच. कामात गोष्टी मनासारख्या होतील.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

मिथुन राशीचे लोक आज आपल्या स्वभावाला मुरड घालून जरा शांत बसले तर बरे होईल. कारण, आज आपल्या बोलण्याने आपण अडचणी येण्याची शक्यता.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

कर्क राशीच्या महिला आज पतीसाठी विशेष देवाची उपासना करतील. काहींचे उपासनेमध्ये मन रमेल. संततीच्या सुवर्ता मिळतील.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

सिंह राशीच्या लोकांच्या कुटुंबियांशी निगडित छान गोष्टी घडतील. दिवस समाधानाचा असेल. जमीन खरेदीचे व्यवहार मार्गी लागतील.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

कन्या राशीच्या लोकांना आज भावंडांचे विशेष सहकार्य लाभेल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास घडतील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आज लक्ष्मी प्राप्तीसाठी "सोन्यासारखा दिवस" आहे. पैशाची आवक जावक चांगली राहील. गुंतवणूक फायद्याची ठरेल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवी उमेद आणि नवीन स्वप्न घेऊन आला आहे. सकारात्मकता वाढेल. संधीचे सोने कराल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

धनु राशीच्या लोकांनी आज जोडीदाराला समजून घ्यावे. मनस्थिती नीट ठेवणे आपल्या हातात आहे. विनाकारण त्रास मनस्ताप असे विचार घेराव घालतील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मकर राशीच्या लोकांच्या आज जुन्या ओळखी आणि गाठीभेटी वाढतील. त्यातून मोठा लाभ होण्याची शक्यता. "सोने पे सुहागा" असा आजचा दिवस.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीतरी जोश नवीन उमंग घेऊन आलेला आहे. कामात स्वतःला झोकून द्याल. कामांमध्ये नवीन "इंद्रधनु पेलण्याचा" दिवस.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

मीन ही रास मुळातच प्रेमळ आहे. महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त पतीसाठी विशेष उपासना करावी. या उपासना नक्कीच फलदायी ठरतील.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : सावधान! नेलपॉलिश लावायला आवडतं? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम..

Disadvantages of Nail Polish | SAAM TV