Rashi Bhavishya : आज 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट, वाचा राशी भविष्य

Anjali Potdar

मेष

आज तुम्हाला जोडीदाराविषयी आपुलकी वाटेल. एकमेकांची सहकार्याने अनेक कामे पार पाडाल. दिवस छान जाईल.

मेष राशी भविष्य | Saam TV

वृषभ

आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता तसेच तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. पैशांशी निगडीत अडचणीत सापडू नका.

वृषभ राशी भविष्य | Saam TV

मिथुन

आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. आनंद द्विगुणीत होईल. देवधर्मावर विश्वासही वाढेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात नक्कीच यश मिळेल. वेगळ्या संधी आज पायाशी लोळण घालतील. शिरपेचामध्ये यशाचा तुरा खोवला जाईल.

कर्क राशी भविष्य | Saam TV

सिंह

सिंह राशीच्या लोकांची आज महत्वाची कामे मार्गी लागतील. केलेल्या गोष्टींची सार्थकता झाल्याचे आज जाणवेल. दिवस आशावादी राहील.

सिंह राशी भविष्य | Saam TV

कन्या

आपली रास अतिविचारी आहे. त्यामुळे आज जास्त विचार करू नका. मानसिक अस्वस्थता येणार नाही हे लक्षात ठेवा.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. कोणतीही कामे धाडसाने पार पाडाल. नव्या उमेदीने काही गोष्टी कराल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ आणि पैसा याचा ताळमेळ साधा. लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपासना करा.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

धनु राशीच्या व्यक्तींचे आज काही नवीन परिचय होतील. त्याच्यामधून पुढील कामे सहजगत्या होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मकर राशीच्या महिलांना आज माहेरच्या आठवणी जास्त येतील. कुटुंबियांबरोबर वेळ व्यतीत कराल. प्राण्यांविषयी विशेष ओढ वाटेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींचे आज संसतीचे प्रश्न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात विशेष पुढाकार घ्याल. कला मनोरंजन क्षेत्रात आनंद लुटाल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

मीन राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील. कामाचा ताण आणि तणाव वाढेल. पण जिद्दीचे सगळ्याला सामोरे जाल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : 'या' पदार्थांचे सेवन करा; वजन होईल झटपट कमी

Mistakes | Saam TV