Rashi Bhavishya : शनिवारी तुमच्या नशिबात काय? वाचा संपूर्ण राशीभविष्य

Satish Daud

मेष

विनाकारण काही गोष्टीचे खापर तुमच्या फुटू शकते. त्यामुळे आज जरा सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवल्यास बरे राहिल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज चैनीसाठी पैसा खर्च कराल. इतरांनाही अनेक गोष्टी देऊन खुश कराल. नातेवाईकांसोबत आनंदात सहभागी होण्याचे योग.

Vrushabh Rashi Bhavishya

मिथुन

कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता. प्रवास होतील आणि त्यातून फायदाही होईल. नवीन ओळखी होतील.

Mithun Rashi Bhavishya

कर्क

राजकारणामध्ये असलेल्या व्यक्तींसाठी आज प्रगतीचे योग. इतरांना पुढे जाऊन देण्याचा आपला स्वभाव आज हानिकारक ठरू शकतो.

Kark Rashi Bhavishya

सिंह

आज व्यवहार सुरळीत ठेवल्यास चांगला फायदा होईल. पैशांच्या बाबतीत मोठी रिस्क घेणं टाळा. शारीरिक श्रम वाढतील.

Sinh Rashi Bhavishya

कन्या

कोर्टकचेरीच्या भानगडीत पडू नका. तुझे माझे करण्यात उगाच वेळ घालवू नका. कामाची दगदगड होईल.

Kanya Rashi Bhavishya

तूळ

आज थोडी तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे टाळा. अन्यथा जुने आजार त्रस्त करून सोडतील.

Tul Rashi Bhavishya

वृश्चिक

आज तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो. पैशाशी निगडित गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. त्यामध्ये योग्य ती वाढ होईल.

Vruchik Rashi Bhavishya

धनु

आज तुम्हाला काय करावे आणि काय नाही हे सूचणार नाही. दिवस थोडा संभ्रमित असेल. कामांचा गाडा उपसावा लागेल.

Dhanu Rashi

मकर

पराक्रमाच्या दृष्टीने आजचा दिवस छान संधी घेऊन आलेला आहे. केलेल्या कामाचे तुम्हाला एकट्यालाच श्रेय मिळेल.

Makar Rashi Bhavishya

कुंभ

ओळखीतून पैशांचे व्यवहार होतील. तुम्ही जोडलेले संबंध तुमच्या कामी येतील. मात्र, कुणावरही जास्त विश्वास ठेऊ नका.

Kumbh Rashi Bhavishya

मीन

आजच्या दिवस तुमच्यासाठी भाग्याचा असेल. केलेल्या गोष्टीची पूर्तता होईल. आत्मिक समाधान लाभेल.

Meen Rashi Bhavishya

NEXT : ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई...

Taapsee Pannu Look
क्लिक करा