Rashi Bhavishya: या राशींच्या लोकांची मोठी धावपळ होण्याची शक्यता

Anjali Potdar

मेष

संकटाची मालिका सुरू राहील. उगाचच तक्रारी राहतील. सावधगिरीने पावले उचला.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

कामाची दगदग राहील. पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून घालमेल राहील. पण यामध्ये सुद्धा वेगळा आनंद मिळेल.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

पोटाच्या तक्रारी सतावतील. उष्णतेचे विकार होतील. तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. हाताखालचे लोक उर्मटपणे वागतील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

प्रेमासाठी गुलाबी दिवस. कला, मनोरंजन याच्यासाठी मन बहरलेले राहील. मात्र शेअर, रेस आणि लॉटरीसाठी आहे.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

महत्वाची कामे मार्गी लागतील. प्रलंबित कामे आज मार्गी लागतील. शेतकऱ्यासाठी आज कष्टाचा दिवस.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

युक्तीने गोष्टी साध्य होतील. शरीराबरोबरच बुद्धीचा पराक्रम राहील. आपली बौद्धिक रास म्हणून जे काम असेल ते लीलया पार पाडाल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

सौंदर्यासाठी आज पैसे खर्च कराल. खर्च कधी होतो जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात. म्हणून पैसे मिळण्याचाही आजचा दिवस.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

मनात सकारात्मक विचार असतील. दुसऱ्यांना देऊन दिवस आनंदात साजरा कराल. मित्र, कुटुंबियांसोबतचा अबोला टाळा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

विनाकारण खर्च करणे टाळा. थोडा हात आखडता घ्या. पैसे खर्च झाल्यामुळे मनस्वास्थ बिघडणार नाही ना याची काळजी घ्या.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

"सोन्याची संधी आणि संधीच सोनं" असा आजचा दिवस आहे. मनाला भावणाऱ्या वेगळ्या गोष्टी घडतील. कामात स्वत: ला झोकून द्याल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज कामाची दगदग राहील. त्यामुळे मोठी धावपळ होण्याची शक्यता. पण प्रयत्न सोडू नका. सरते शेवटी यशाचा तुरा मिळेल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

आयुष्याचा आनंदातील आजचा हा एक दिवस. देवावरचा विश्वास वाढेल. देवभोळेपणा वाढेल. पाण्याजवळ प्रवास होतील.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: जास्त व्यायाम केल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात?

Exercise | Saam Tv