Horoscope 12 May 2024 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल? जाणून घ्या

Anjali Potdar

मेष

शेजारच्यांसोबत चांगले वागा. ते वेळेला मदतीला येतील. आज महत्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

पैशांची अचानक आवक वाढेल. व्यवसायात वाढ होऊ शकते. आर्थिक प्रश्न मिटतील.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

तुमचं मानसिक स्वास्थ चांगलं राहील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. पुढे जाण्याचे मार्ग मिळतील.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

आज तुम्हाला जीव ओतून काम करण्याची गरज आहे. शांत आणि संयमाने कामे करा. दिवस चांगला जाईल.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

मित्र मंडळी आणि मैत्रिणींसोबत सौहार्दाने वागा. तुमचा वरचढपणा आज दिसता कामा नये. प्रेमाने जग जिंकता येईल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज तुमच्या राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासाच्या वेळी चांगल्या गोष्टी घडतील. भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटेल.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तुमच्या वैचारिक परिवर्तनाचे दिवस जवळ येत आहेत. त्यामुळे विचारपूर्वकच कामे करा. संतती विषयी उगाच चिंता नको.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आज फुकटात वेळ वाया घालवू नका. वेळेला किंमत देऊन महत्वाची कामे पूर्ण करा. खिसा रिकामा होऊ शकतो.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

व्यवसायात तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो. नवी गोष्टीची आणखी कराल. जोडीदारासोबतचा वाद मिटेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज. दैनंदिन कामे लवकर पूर्ण करा, अन्यथा नुकसान होऊ शकतं.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

धार्मिक कार्याची गोडी राहील. त्यातून सात्विक आनंद मिळेल. सद्गुरूंची विशेष उपासना करा.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

तुमच्या कामाचे आज कौतुक होईल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. मात्र आपले पाय जमिनीवरच ठेवा.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT: घरात झोपाळा लावणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र

Vastu Tips | Saam TV