Monday Horoscope: गोड बोलून कामं पूर्ण करा, 5 राशींवर असणार शंकराची कृपा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज कामासाठी ऊर्जा भरपूर असेल, सगळं लवकर पूर्ण करण्याची इच्छा होईल. इतर लोक तुमच्या गतीने न चालल्याने चिडचिड होऊ शकते.

मेष | Saam tv

वृषभ

दैनंदिन रूटीन कंटाळवाणं वाटू शकतं, काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन हलकं होईल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

एकाच वेळी अनेक कामं समोर येतील, प्रत्येक गोष्टीला होकार देण्याचा मोह होईल. मर्यादेत काम घ्या, नाहीतर ताण वाढेल.

Mithun | saam tv

कर्क

आज मन थोडं भावनिक राहू शकतं, छोट्या गोष्टीही मनाला लागू शकतात. शांत वातावरणात वेळ घालवा, काम हळूहळू केल्यास चांगलं होईल.

कर्क | Saam TV

सिंह

कामात तुमचा प्रभाव दिसेल, लोक तुमचं ऐकतील आणि काम पुढे जाईल. अहंकार टाळा, शांत वागल्याने जास्त फायदा होईल.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाटतील, कामाचा ताण जाणवेल. तरीही तुम्ही सगळं सांभाळाल, पण मध्ये-मध्ये विश्रांती घेणं आवश्यक आहे.

Kanya Rashi | Saam TV

तु

लहान गोष्टींकडे लक्ष देण्याची तुमची सवय आज फायदेशीर ठरेल. जास्त विचार टाळा.

तुळ | saam tv

वृश्चिक

आज तुमचा मेंदू खूप सक्रिय राहील, प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार होईल. ओव्हरथिंकिंग टाळा.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

मन थोडं असंतुलित राहू शकतं, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. स्वतःच्या गरजांनाही महत्त्व द्या, प्रत्येक वेळी तडजोड करणं गरजेचं नाही.

धनू | saam tv

मकर

काही गोष्टी मनातच ठेवण्याची प्रवृत्ती वाढेल, त्यामुळे मन जड होईल. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जास्त विचार टाळा.

मकर | Saam Tv

कुंभ

नवीन प्लॅन्स डोक्यात येतील, पण त्यांना पूर्ण करणं महत्त्वाचं आहे. एक काम निवडून ते पूर्ण करा, तेव्हाच समाधान मिळेल.

कुंभ | Saam Tv

मीन

मन संवेदनशील राहील, छोट्या गोष्टींचाही जास्त परिणाम होऊ शकतो. शांत राहा आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहून कामावर लक्ष द्या.

Meen | Saam Tv

NEXT: खमंग मुगाचे सांडगे यंदाच्या उन्हाळ्यात बनवाच, वाचा सोपी रेसिपी

protein rich snacks
येथे क्लिक करा