Sakshi Sunil Jadhav
यश खेचून आणण्यासाठी वेगळी स्वप्न बघावे लागतात. आपली जिद्द आणि चिकाटी यांत सातत्य असेल तर एक वेगळा पराक्रम गाजवला जाईल. आज असा दिवस आहे. जबाबदारी आली तरी सुद्धा न डगमगता पुढे जाल.
जुनी येणी वसूल होणार आहेत. मन आनंदी राहील. अचानक धनलाभ होईल. वारसा हक्काची संपत्ती, बँक, मुदत ठेवी, त्यामधून मिळणारे व्याज यामुळे दिवस आज धनासाठी मालामाल असेल.
तशा आपल्या राशीला नाविन्याची शोध कायमच असते. आज नवीन दिशा, नवीन मार्ग चोखाळण्यामध्ये व्यस्त रहाल. मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना सुख देतील.
दिवसात काही त्रास नाही तर तो दिवस कसा! असे काहीसे आज वाटून जाईल. वाहने जपून चालवावीत. मनस्तापहि वाढण्याचे योग आहे. अध्यात्माकडे कल ठेवा यातून बाहेर पडाल.
कामाची नव्याने साखळी जोडण्यासाठी नवीन परिचय व्हावे लागतात. आज नव्याने परिचय होतील. आपल्या प्रियजनांचा सहवासही लाभेल.
सर्व काही नसताना प्रगती होती आहे असे दिसेल. तुमचे बौद्धिकतेवर कोणालाही शंका येणार नाही.तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
आयुष्य हे सुखदुःखाने भरलेले आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आज सुखाच्या काही गोष्टी आपल्या पदरात येणार आहेत. एखादी भाग्यकाराचा घटना घडेल. गणेश उपासना करा संकष्टी चतुर्थी आहे.
"आरोग्य धनसंपदा" हे लक्षात ठेवा. चुकीच्या सवयीमुळे आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाचा डोंगर पुढे उभे असताना मनोबल मात्र कमी राहील. काळजी घ्यावी.
वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. एकमेकांच्या मुळे उत्साह आणि उमेद सुद्धा वाढणार आहे. संसारिक आणि व्यवसायिक दोन्ही जबाबदाऱ्या आज संतुलित कराल.
कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने पुढे जाल. आज हितशत्रूंचा त्रासही संभवतो आहे. येणाऱ्या गोष्टींना धाडसाने तोंड देणे याशिवाय आज दुसरा काही पर्याय असू शकत नाही.
आर्थिक क्षेत्रामध्ये घोडदौड चांगली होईल. दिवस चांगला आहे. गणेश उपासना करावी. संकष्टी फलदायी ठरेल. एखादी मोठी कामगिरी आपल्या हातून होणार आहे.
प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.