Sakshi Sunil Jadhav
धनसंचय यासाठी गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तिखट, मसालेदार पदार्थ खाण्याची विशेष आवड आज जोपासली जाईल. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र काळजी घ्यावी.
आपल्यातले चांगले गुण बाहेर काढून त्यावर विशेष काम आज तुम्ही कराल. स्वमग्न असा दिवस असेल. कला, मनोरंजन क्षेत्रामध्ये मन रमेल. आरोग्यदायी असाच दिवस आहे.
ठरवले होईल असे काही आज वाटत नाही. विनाकारण कटकटी, त्रास वाढतील. सावधगिरीने पावले उचलावी लागतील. दिवस संमिश्र आहे.
मैत्रीचे बंध दृढ होतील. जुन्या ओळखीतून, परिचयातून लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. काही गुंतवणूक केली असेल तर त्याची चांगली फलिte आज मिळतील. दिवस समाधानी आहे.
आपल्या राशीला मुळातच डाम डौल, दिखावा करण्याची आवड आहे. काही गोष्टी पुढाकार घेऊन आज कराल आणि त्याचे योग्य तो मान आपल्या पदराचा पडेल. कर्म प्रधानता असेल.
विष्णू उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. प्रवासाला दिवस चांगला आहे. काही मोठ्या प्रवासाचे भारतामध्ये नियोजन करणार असाल तर ते योग्य ठरेल. तीर्थक्षेत्र भेटी होतील.
अचानक धन्यालाभ,मोठा काहीतरी पैसा हाती येण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयातले गुढत्व वाढेल. गुप्तधना विषयीच आकर्षण विशेष वृद्धिंगत होईल.
आयुष्य हा ऊन पावसाचा खेळ आहे. हे आज जाणवेल. संसारामध्ये चांगल्या वाईट गोष्टीतून आज मार्ग काढावा लागेल. पण जोडीदाराची उत्तम साथ मिळाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल.
जेवढी नाती जपायला जातो आपण तितकाच नात्यामधून त्रास होतो. काही वेळा मन स्वतःमध्ये असणे आहे जास्त बरे असं वाटेल. आज अडचणी गाढून, एकट्यालाच मात काढून पुढे जावे लागेल. दत्त भक्तीत रममाण व्हाल.
शंकराची उपासना करावी उत्तम फलित त्याचे आज तुम्हाला मिळतील. शेअर्स, लॉटरी, रेस यामध्ये पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे. दत्त जयंती चे विशेष फल आपली वाट पाहत आहे.
जागा खरेदी - विक्री मधून धनलाभ संभवत आहे. शेतीची कामे मार्गी लागतील. विशेष फायद्याचा आजचा दिवस आहे.एकूण सर्व सुखी आज आपल्या दाराशी असतील.
बहिणीची विशेष माया,प्रेम आज लाभेल. काही मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर येतील. पण भावंडांचे सौख्य असल्यामुळे ते खंबीरपणे पेलाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागतील.