Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आपली रास कोणत्याही काम घेते पण काही वेळेला अर्धवट राहण्याची सवय असते. उतावळेपण असते. आज हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उष्णतेच्या तक्रारी वगळता आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Mesh | saam tv

वृषभ

कामाचे एकूण ताण आणि दगदग आज जाणवण्याचा दिवस आहे. म्हणूनच प्रवास टाळणे गरजेचे आहे. पैशाला विविध वाटा फुटतील. मनोबलही कमी राहील. काळजी घ्यावी.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

महत्त्वाचे पत्रव्यवहार आज पार पडणार आहेत. अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल. विविध लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. विशेषतः परदेशी वार्तालाप होतील.

Mithun | saam tv

कर्क

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. केलेल्या कामाचे योग्य ते कौतुक झाल्यामुळे मनोबल आणि आत्मविश्वास वाढता राहील.

kark | saam tv

सिंह

काही गोष्टी न ठरवता होतात तसा आजचा दिवस आहे. विशेष गुरुकृपा आपल्याला लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता कानी येईल. आपण फक्त निमित्त मात्र असतो हे आज जाणून येईल.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

नकटीच्या लग्नाला असा काहीसा दिवस आहे. म्हणून सतराशे साठ विघ्न येतीलच. केलेल्या कामात अडथळे आहेत. वाहने जपून चालवा. खर्चालाही धरबंद राहणार नाही.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

वैश्य प्रवृत्तीची आपली रास आहे.भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. संसारीक गोष्टींमध्ये सुद्धा विशेष रस तुम्हाला आज निर्माण होईल. दिवस चांगला आहे .

Tul Rashi | Saam Tv

वृश्चिक

केलेल्या कामाचं जणू काही "पालथ्या घरावर पाणी" असा दिवस आहे. वेळा आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मनोरंजनाकडे कल असू शकेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

संतती सौख्याला दिवस चांगला आहे. धनासाठी आपली रास खरच लाभदायी आहे. आज आर्थिक क्षेत्रात एखादं धाडस करायला हरकत नाही. प्रेम प्रणयामध्ये सुद्धा यश दिसते आहे.

Dhanu Rashi | Yandex

मकर

चिकट आणि चिवट असणारी आपली रास. पुढील गोष्टींचे नियोजनही उत्तम असते. आज तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. मानसिक स्वास्थ, समाधान लाभणारा आजचा दिवस आहे.

मकर | Saam Tv

कुंभ

न बोलता अविरत काम करणं हि आपल्या राशीची खासियत आहे. आज विशेषत्वाने तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरीमध्ये सुद्धा समाधानकारक स्थिती राहील. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

अचानक धनलाभ होईल. व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र आज तुम्ही अवलंबू शकाल. कामाच्या ठिकाणी अडथळे आले तरीसुद्धा ते पार पडतील. कुटुंबीयांचे योग्य ते सहकार्य आज लाभेल.

Meen | Saam Tv

NEXT: Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Homeguard vacancy update
येथे क्लिक करा