Sakshi Sunil Jadhav
क्रीडा क्षेत्रात विशेष प्रगती होण्याचा आजचा दिवस आहे. काही मोठे सन्मान आपणास मिळतील. शेअर्स आणि लॉटरीमध्ये उत्तम प्रगती दिसते आहे. गणेश उपासना करावी.
घर सजवायला आपल्याला राशीला खूप आवडते. नव्याने काही वस्तूंची खरेदी कराल. जीवन जगण्यासाठी असणाऱ्या सर्व गोष्टींचा आज आल्हाद घ्याल. सर्व सुखांच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
मोठ्या भावंडांची विशेष आपल्यावर करार मदार असेल. अडचणीच्या प्रसंगातून आज बाहेर निघाल. काही जबाबदाऱ्या तुम्हालाही नव्याने अंगावर येण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे.
पैशाची आवकजावक चांगली राहील. येणाऱ्या जाणाऱ्या पैशाची सुखासाठी गुंतवणूक होईल आणि खर्चही कराल. मन भरून आजचा दिवस जगाल. कुटुंबीयांची साथ चांगली राहील.
एक वेगळी चाल आज तुमची असेल. "मोडेन पण वाकणार नाही" असा बाणा असेल. सकारात्मकता आणि शिस्तीने घडणारा आजचा दिवस आहे.
पैसे तर खर्च होईल पण हिशोब लागत नाही म्हणून मन चुकचुकेल. आपल्याच लोकांच्याकडून घात झाल्यासारखे काही गोष्टी आज तुम्हाला घडतील.
बोलून समोरच्याला आपलेसे कराल. नव्याने परिचय होतील. वैश्य प्रवृत्ती वाढीस लागेल. अर्थात व्यापारामध्ये नव्याने सृजनशीलता घडून येईल.
समाजकारणात राजकारणात प्रगती होणार आहे. आपल्या लोकांकडून शाब्बासकीची थाप आपल्याला मिळेल. कर्म चांगले राहिल्यामुळे दिवस सत्कारणी लागेल.
दत्तगुरूंची उपासना तुम्हाला योग्य ते पदावर पोहोचवेल. यशाची मार्गे दालने आपोआप खुली होतील. नव्याने संकल्प कराल आणि जीवनाची नवी दिशा आजमावल.
चुकीच्या मार्गातून अडकण्याचा आज संभव आहे. आपलेच लोक आपल्याला दगा देतील. काही वेळेला एकटेपणाची भावना निर्माण होईल याची मात्र विशेष काळजी घ्या .
व्यवसायामध्ये भरभराट होईल. अडचणी आणि रेंगाळलेले कामे मार्गी लागणार आहेत. सुकर आणि सहज दिवस असेल. जोडीदाराबरोबर आनंदी क्षण घालवाल.
तब्येत जपावी. कामाच्या ठिकाणी दगदग वाढेल. हितशत्रू वाढतील. नव्याने पण आणि संकल्प घेऊन नेटाने कामाला लागा.