Wednesday Horoscope: या ५ राशींना अचानक होणार धनलाभ, कामातले अडथळे वाढणार; वाचा बुधवारचे खास राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

"प्रेमाला उपमा नाही" असा काहीसा दिवस आहे. समोरच्या व्यक्तीचे मन जाणून आज वागणं गरजेचे आहे. उगाचच अहंकारामुळे नाती दुरावणार नाहीत ना? याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना दिवस प्रगतीपथावर नेणारा आहे.

मेष राशी | saam tv

वृषभ

सर्वच गोष्टीत कलासक्त असणारी आपली रास आहे. घरामध्ये नव्याने काहीतरी बदल करण्याचा मानस असेल तर आज पूर्ण होईल. वाहनसौख्य, गृहसौख्य, मातृसौख्य या सर्वांसाठी दिवस चांगला आहे.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

लेखक, प्रकाशक, कागद व्यवसायिक, शाई विक्रेते इत्यादी. तसेच छोटे व्यवसाय करणारे सर्व व्यावसायिक यांना आजचा दिवस चांगला आहे. लहान प्रवास होतील. नव्याने परिचय होऊन व्यवसायात वृद्धी होईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

घरी पाहुण्यांचे आगमन होईल. विशेष अगत्य, आदरातिथ्य याच्यामध्ये तुम्ही मग्न असाल. आपल्याच लोकांसाठी करण्यात आपल्याला कोण आनंद होतो. तसेही आपली रास हळवी आणि प्रेमळ रास आहे. आज घरातल्यांसाठी जीव ओतून काम कराल.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींना मुरड घालण्याचा आजचा दिवस मुळीच नाही. जे आवडेल ते करा. त्यामधून आनंद लुटाल. तुमचा प्रभाव इतरांवर राहील. तुमचा सकारात्मक स्वभाव इतरांना जगण्यासाठी उर्मी देणारा ठरेल.

सिंह राशी | saam tv

कन्या

खर्च झाला याचा त्रास नसतो तर हिशोब लागत नाही याचा त्रास आपल्या राशीला होतो. सर्व व्यवहार बरोबर करण्यामध्ये आपल्या राशीचा हात कोणी धरू शकत नाही. आज या सगळ्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

स्वार्थापयी कोणत्याही गोष्टी आज करू नका. मैत्रीत सुद्धा निरपेक्ष प्रेम आज देणे गरजेचे आहे. तरच सर्व लाभ तुमच्या पदरात पडतील. पैशाचा अपव्यय न होता गुंतवणुकीतून फायदा होईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

काही झाले तरी आपल्या राशीला कुठेतरी scar येतोच. न केलेल्या गोष्टींचे खापरही आपल्यावर फुटते. आज मात्र अशा काही गोष्टी होणार नाही तर आपल्या पदरी मान, सन्मान, पत, प्रतिष्ठा येणार आहे.खुश राहा.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

देवाने दिलेल्या गोष्टींविषयी एक वेगळी कृतज्ञता आज जाणवेल. कधीकधी असे वाटेल गरजेपेक्षा अधिकच आपल्याला सर्व छान मिळाले आहे. इतरांना आपल्या आनंदात बरोबर घेऊन जाण्याचा आजचा दिवस आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

हमालकष्ट हा जरी शब्द असला तरी आपल्या राशीला या शब्दाचे वेगळेपण काहीच नाही. शारीरिक नाही तर मानसिक त्रास कुठल्यातरी गोष्टी तुमच्या मागे नेहमीच असतात.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

मतामध्ये विरोधाभास असला तरी जोडीदाराबरोबर आज मनभेद होणार नाहीत तर मतभेद होतील. अर्थात सर्व गोष्टी सामोपचाराने संसारासाठी दोघांनी घेणे गरजेचे आहे.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

संतती काहीतरी चांगल्या बातम्या आज तुम्हाला देणार आहे. त्याबद्दल नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल. कला, क्रीडा क्षेत्र यामध्ये प्रगती होईल. काव्यामध्ये सृजनशीलता असेल. दिवस चांगला आहे.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: Non Acidity Pohe Recipe: पित्त न वाढवणारे कांदे पोहे कसे बनवायचे? वाचा सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

easy poha recipe
येथे क्लिक करा