Sakshi Sunil Jadhav
कामा प्रती एकनिष्ठ रहा. भरपूर संधी चालून येतील त्याचं सोनं करा. तेल किंवा धातूंचा व्यापार करणाऱ्यांना खूप चांगला दिवस आहे.
परिवाराकडे लक्ष द्या. नातेवाईकांमध्ये गैरसमज होऊ शकतो फार बोलणं टाळावं. आत्ममग्न राहून स्वकार्याकडे लक्ष द्यावं.
कच्च्या कानाचे राहू नका. ऐकलेल्या गोष्टींपेक्षा स्वानुभवावर विश्वास ठेवा. ध्यान धारणा केल्यास मनःशांती लाभेल.
नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास आजचा दिवस उत्तम आहे. कुलदेवतेची पुजा करुन सुरुवात करा. गोड फळे खाऊन घराबाहेर पडावं.
अपत्यांची चिंता दूर होईल. अपत्यांसोबत प्रेमानं वागा. त्यांच्या दोषांकडे दूर्लक्ष करा. गुरू ची उपासना करावी.
घराबाहेर जास्त वेळ जाईल. मित्रमंडळी सोबत वेळ घालवा. खूप काळजी करायची गरज नाही. संपूर्ण जग तूम्ही चालवत नाही.
आर्थिक व्यवहार जपून करा. उसणे पैसे देणं टाळावं. विशेषतः पत्नीची मनधरणी करावी. गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास उत्तम.
स्वभावातला हेकेखोर पणा सोडा. सद्गुणांचा गुणाकार आणि दूर्गुणांचा भागाकार करा. म्हणजे सगळं आपोआप व्यवस्थित होईल. गरिबांना अन्नदान केल्यास उत्तम.
परदेशाशी संबंधित नोकरीचे किंवा व्यवसायांचे योग आहेत. दुर्गा देवीची उपासना करावी विशेष लाभ होईल. मौन पाळावे.
भूतकाळात केलेला एखादा नवस फेडण्यासाठी प्रयत्न करा. लगेच लाभ होईल. कोणालाही शब्द देणं टाळावं. समाजापासून थोडं अलिप्त राहणं योग्य.
नोकरी बदलाचे योग आहेत. भरपूर प्रयत्न करा. अपेक्षित यश मिळेल. "चिंता करितो विश्वाची" हे धोरण सोडा. तूम्ही समर्थ रामदास स्वामी नाही, संसारात आहात याचे भान ठेवा.
उद्योगांत नवीन संधी चालून येतील. उद्योगाच्या जाहिराती कडे लक्ष द्या, फायदा होईल. कामगारांची मर्जी राखा, सोडून जाऊ शकतात."अहम् ब्रह्मास्मि" हे धोरण व्यवसायात अंगीकृत करा.