Rasgulla Recipe: या उन्हाळ्यात घरच्या घरी झटपट बनवा स्पंजी आणि रसदार रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

१ लिटर दूध, २ चमचे लिंबाचा रस, १ कप साखर आणि ४ कप पाणी – एवढ्या साहित्याने रसगुल्ले सहज तयार होतात.

Rasgulla recipe | SAAM TV

पनीर (छेना) तयार करा

दूध उकळून त्यात लिंबाचा रस घाला. दूध फाटल्यानंतर कापडात गाळून पनीर वेगळे करा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

Rasgulla Recipe

पनीर मऊ मळा

छेना हाताने ८-१० मिनिटे मळा, जोपर्यंत तो गुळगुळीत आणि मऊ होत नाही. यामुळे रसगुल्ले स्पंजी बनतात.

Rasgulla Recipe

गोळे तयार करा

मळलेल्या पनीरचे छोटे-छोटे गोल गोळे तयार करा. त्यात क्रॅक्स नसतील याची काळजी घ्या.

Rasgulla Recipe

साखरेचा पाक बनवा

एका भांड्यात पाणी आणि साखर उकळून हलका पाक तयार करा.

Rasgulla Recipe | pinterest

रसगुल्ले शिजवा

उकळत्या पाकात गोळे टाका आणि झाकण ठेवून १५-२० मिनिटे शिजवा. ते दुप्पट फुगतील.

Rasgulla Recipe

थंड करून सर्व्ह करा

रसगुल्ले थंड झाल्यावर अधिक रस शोषतात. फ्रिजमध्ये ठेवून थंड-थंड सर्व्ह केल्यास चव आणखी छान लागते.

rasgulla recipe | google

Actors Who Become CM: चित्रपटातून थेट राजकारणात; थलापती विजय यांच्यासारखेच 'हे' कलाकार बनले मुख्यमंत्री

Thalapathy vijay Party
येथे क्लिक करा