Rasgulla Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्पाँजी रसगुल्ला, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

दूध, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, साखर, पाणी आणि थोडं मैदा किंवा रवा याची आवश्यकता असेल.

rasgulla recipe step by step

छेना तयार करा

दूध उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. दूध फाटल्यानंतर छेना स्वच्छ कापडातून गाळून घ्या.

Rasgulla recipe | SAAM TV

छेना मळून घ्या

छेना चांगला मऊ होईपर्यंत हाताने मळा. यामुळे रसगुल्ले मऊ आणि स्पॉंजी होण्यास मदत होते.

Rasgulla Recipe

गोळे तयार करा

तयार छेन्याचे छोटे-छोटे समान आकाराचे गोळे बनवा. गोळ्यांना भेगा राहणार नाहीत याची काळजी घ्या.

Rasgulla Recipe

साखरेचा पाक बनवा

एका मोठ्या भांड्यात साखर आणि पाणी उकळून पातळ पाक तयार करा. रसगुल्ले फुलण्यासाठी भांड्यात पुरेशी जागा ठेवा.

Rasgulla Recipe

रसगुल्ले शिजवा

तयार गोळे उकळत्या पाकात सोडा आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा. रसगुल्ले आकाराने फुलल्यानंतर गॅस बंद करा.

Rasgulla Recipe

रसात मुरू द्या

शिजलेले रसगुल्ले काही वेळ साखरेच्या पाकातच राहू द्या. यामुळे ते पाक शोषून घेतील आणि अधिक रसाळ लागतील.

Rasgulla Recipe

Jodhpuri Mirchi Vada Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा झणझणीत आणि कुरकुरीत जोधपुरी मिरची वडा, वाचा रेसिपी

Jodhpuri Mirchi Vada Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा