Shruti Vilas Kadam
मोठ्या हिरव्या मिरच्या, बेसन, उकडलेले बटाटे, जिरे, बडीशेप, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल घ्या.
मिरच्या स्वच्छ धुऊन मधून चिरा. त्यातील बिया काढून घ्या. मिरच्या फार तिखट असतील तर काही वेळ पाण्यात ठेवू शकता.
उकडलेले बटाटे कुस्करून त्यात मसाले, मीठ, जिरे आणि बडीशेप घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
तयार केलेलं बटाट्याचं सारण मिरच्यांमध्ये घट्ट भरून घ्या.
बेसनात हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडं तेल घालून पाणी मिसळा. मध्यम घट्टसर पीठ तयार करा.
सारण भरलेल्या मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून गरम तेलात सोडा. मध्यम आचेवर वडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तयार जोधपुरी मिरची वडा गरमागरम चहा, हिरवी चटणी किंवा चिंच-गुळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.