Shreya Maskar
रसगुल्ले बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात दूध उकळून त्यात लिंबाचा रस घाला आणि दूध छान आटवून घ्या.
आटवलेल्या दुधातील पाणी गाळून पनीरचा गोळा 30 मिनिटे कोरडा करायला ठेवा.
रसगुल्ल्याचा पाक बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि साखर घालून उकळवा.
पनीरच्या गोळ्यात कॉर्नफ्लोर घालून मळून घ्या.
या पिठाचे छोटे गोळे करून साखरेच्या पाकात घाला.
साखरेच्या पाकात रसगुल्ले १५ ते २० मिनिटे घोळवा.
अशाप्रकारे रसाळ रसगुल्ले तयार झाले.
थंड रसगुल्ले खायला आणखी छान लागतात.