Shreya Maskar
मटार- पनीर पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ, हिरवे मटार, पनीरचे तुकडे, आले, लसूण , लिंबाचा रस , मीठ आणि खडे मसाले इत्यादी साहित्य लागते.
मटार- पनीर पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुवून भिजत ठेवा.
पॅनमध्ये तूप घालून त्यात जिरे, तमालपत्र, लवंगा, दालचिनी आणि काळी मिरी, आले- लसूण पेस्ट आणि पनीरचे तुकडे घालून गोल्डन तळून घ्या.
या मिश्रणात तांदूळ, मटार घालून चांगले परतून घ्या.
५ ते १० मिनिटे तांदूळ मंद आचेवर उकडून घ्या.
शेवटी या मिश्रणात गरम मसाला, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस टाकून तळून घ्या.
आता पुन्हा पुलाव १० मिनिटे शिजवून घ्या.
गरमागरम पुलावचा रायत्यासोबत आस्वाद घ्या.