Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

रसगुल्ले बनवण्यासाठी एक लिटर फुल क्रीम दूध, दोन ते तीन चमचे लिंबाचा रस, एक कप साखर आणि चार कप पाणी घ्या. लिंबाचा रस वापरण्यापूर्वी त्यात थोडे पाणी मिसळा.

Rasgulla recipe | SAAM TV

दुधापासून छेना तयार करा

एका पातेल्यात दूध उकळवा. गॅस बंद करून त्यात हळूहळू लिंबाचा रस घाला. दूध फाटून पाणी आणि छेना वेगळा झाल्यावर हे मिश्रण स्वच्छ मलमलच्या कापडातून गाळून घ्या.

rasgulla recipe step by step

छेना स्वच्छ धुऊन मळून घ्या

छेना थंड पाण्याने धुऊन घ्या, म्हणजे लिंबाचा आंबटपणा कमी होईल. कापडात बांधून अतिरिक्त पाणी काढा. त्यानंतर छेना तळहाताने साधारण ८ ते १० मिनिटे मळा, जेणेकरून तो मऊ आणि एकसंध होईल.

Rasgulla Recipe

छेन्याचे छोटे गोळे बनवा

तयार छेन्याचे समान आकाराचे छोटे गोळे बनवा. गोळ्यांवर भेगा राहणार नाहीत याची काळजी घ्या. गोळे गुळगुळीत असतील तर शिजताना ते फुटण्याची शक्यता कमी होते.

Rasgulla Recipe

साखरेचा पाक तयार करा

मोठ्या पातेल्यात एक कप साखर आणि चार कप पाणी घालून उकळवा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर पाकाला उकळी येऊ द्या. रसगुल्ले शिजताना पाकात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे.

Rasgulla Recipe

रसगुल्ले पाकात शिजवा

उकळत्या पाकात छेन्याचे गोळे अलगद सोडा. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण १२ ते १५ मिनिटे शिजवा. गोळे फुलून आकाराने मोठे होतील. पाकात पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका.

Rasgulla Recipe

थंड करून रसगुल्ले सर्व्ह करा

गॅस बंद केल्यानंतर रसगुल्ले पाकातच थंड होऊ द्या. थोडा वेळ पाकात मुरल्यावर ते अधिक रसाळ लागतात. थंड किंवा खोलीच्या तापमानाला आलेले रसगुल्ले गोड पदार्थ म्हणून सर्व्ह करा.

Rasgulla Recipe

Veg Spring Roll Recipe: संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी बनवा क्रंची टेस्टी व्हेज स्प्रिंग रोल, वाचा रेसिपी

Veg Spring Roll Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा