ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रणवीर आणि दीपिकाच्या चाहत्यांची यंदाची दिवाळी खूपच गोड झाली आहे.
रणवीर आणि दीपिकाने दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या शुभ मुहूर्तावर लेकीचे फोटो पोस्ट केले आहेत.
दीपिका पदुकोणने तिची मुलगी दुआसोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलीय.
दोघांनी सोशल मीडियावर ऐथनिक ड्रेसमधील स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांची मुलगी दुआचा फोटोही शेअर केलाय.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न १४ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले.
रणवीर आणि दीपिका यांना ८ सप्टेंबर २०२४ रोजी कन्यारत्न प्राप्त झाली.
रणवीर आणि दीपिकाच्या लेकीचं नाव दुआ हे आहे. दुआ या नावाचा अर्थ प्रार्थना असा आहे.