Shreya Maskar
नाशिक-पेठ मार्गावर रामशेज किल्ला हा ऐतिहासिक डोंगरावरील किल्ला वसलेला आहे. किल्ल्याची उंची ३,२७३ फूट इतकी आहे.
रामशेज किल्ला ९ व्या ते १४ व्या शतकादरम्यान, म्हणजेच यादव घराणे आणि बहमनी सल्तनत यांच्या कालावधीत बांधला गेला असावा. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठ्यांचे एक महत्त्वाचे ठाणे बनले.
मराठा पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी १६७१-१६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रामशेज किल्ला जिंकून घेतला. येथे प्राचीन काळातील दगडात कोरलेल्या गुहा, पाण्याचे टाके आणि पश्चिम घाटाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
नाशिकजवळ स्थित असलेला हा किल्ला प्रामुख्याने शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक वेढ्यासाठी प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या एका लहान तुकडीने मुघलांच्या प्रचंड सैन्याविरुद्ध सहा वर्षांहून अधिक काळ हा किल्ला लढवून टिकवून ठेवला. या काळात केवळ ६०० मराठा सैनिकांनी ४०,००० मुघल सैनिकांचा यशस्वीपणे सामना केला होता.
रामशेज किल्ल्याच्या माथ्यावर एक सपाट आणि विस्तीर्ण पठार आहे. डोंगरावरील या उंच पठाराभोवती खड्या आणि उभ्या खडकांच्या कडा आहेत. किल्ल्याचा माथा मोठ्या क्षेत्रावर पसरलेला आहे, तर डोंगराचा पाया आयताकृती आकाराचा आहे.
'आशेवाडी' या पायथ्याच्या गावापासून किल्ल्याला जाण्यासाठी ट्रेक सुरू होतो. पावसाळ्यात येथे स्वर्गाहून सुंदर नजारा पाहायला मिळतो.
मुंबईहून रामशेज किल्ल्यावर जाण्यासाठी नाशिकपर्यंत ट्रेनने प्रवास करा. स्टेशनपासू 'आशेवाडी' पर्यंत जाण्यासाठी रिक्षा किंवा बसने प्रवास करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.