Manasvi Choudhary
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा भारतीय सिनेसृष्टीतील महत्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे.
या चित्रपटात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे सोशल मीडियावर रणबीरचा नवीन लूक समोर आला आहे.
दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे तर केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा अॅक्शन स्टार सनी देओल प्रभू हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर प्रसिद्ध अभिनेते अंजिक्य देव महर्षि विश्वामित्र यांची भूमिका साकारणार आहे.
अरूण गोविल हे दशरथच्या भूमिकेत आहेत तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह शूर्पणखाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेत्री काजल अग्रवाल मंदोदरीच्या भूमिकेत आहे तर कुणाल कपूर इंद्रदेवच्या भूमिकेत आहे.