Saam Tv
भारतात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते.
रामनवमीला श्री प्रभू रामांना प्रसाद म्हणून भोग अर्पण केला जातो. त्यामध्ये पंजिरीचाही समावेश असतो.
श्री रामांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रसाद अर्पण केले जातात. त्यांचा आशिर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहतो.
धने, तूप, साखर पावडर, खिसलेले सुके खोबरे, काजू, बदाम, वेलची
एका कढईत धणे रंग बदलेपर्यंत भाजून घ्या.
त्याच कढईत खिसलेले खोबरे भाजून घ्या.
आता हे संपुर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ठेवा.
त्यामध्ये साखर, काजू-बदाम, वेलची मिक्स करून बारिक वाटून घ्या.
तयार आहे तुमची पंजिरी रेसिपी.