ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पौष्टिक सफरचंदापासून बनलेला हा गोड पदार्थ रक्षाबंधनाच्या सणाला खास बनवेलच. बहिण-भावाच्या नात्यातही आणखी गोडवा आणेल. जाणून घेऊया झटपट रेसिपी.
सफरचंद जिलेबी बनवण्यसाठी काही सफरचंद, मैदा, तेल, दही, साखरेचा पाक आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स असे साहित्य घ्या.
एका भांड्यात मैदा, दही आणि पाण्याच्या मिश्रणाने पिठ तयार करून घ्या.
पिठ पातळ पण थोडे जाडसर असेल याची काळजी घ्या. तयार झालेले पिठ ५ ते ६ तास बाजूला ठेवा.
एका ताटात थोडा मैदा घ्या. त्यात चवीनूसार दालचीनी पूड घालून सुके मिश्रण तयार करा.
सफरचंदाच्या बिया काढून गोल काप करून घ्या. हे काप आधी मैदा आणि दालचीनी पूडच्या सुक्या मिश्रणात मिसळा.
नंतर पातळ पिठात बुडवून गरम तेलात किंवा तुपात मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
तळलेले सफरचंदाचे काप २ ते ३ मिनिटे साखरेच्या पाकात भिजवून ठेवा.
तयार झालेली सफरचंद जिलेबी बारीक चिरलेल्या ड्राय फ्रूट्सने सजवा. थंडगार व्हेनिला आईसक्रिमसह सर्व्ह करा.