Siddhi Hande
रक्षाबंधनाला बाहेरुन मिठाई आणण्यापेक्षा घरीच कलाकंद बनवा.
कलाकंद बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एका पातेल्यात दूध गरम करायचे आहे. त्यानंतर दूध गरम झाल्यावर त्यात लिंबू टाका.
यानंतर दूध सतत हलवत राहा. दूध फाटायला लागले आणि पनीर वेगळे दिसायला लागेल.
यानंतर पनीर आणि पाणी एका चाळणीत काढून घ्या.
यानंतर पनीर धुवून घ्या. त्यातील पाणी काढून टाका. हे पनीर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
यानंतर एका कढईत पनीर, साखर आणि वेलची पूड टाकून मंद आचेवर सतत ढवळत राहा.
यानंतर मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
यानंतर हे मिश्रण घट्ट होईल. त्याच्या वड्या पाडा आणि ड्रायफ्रुट्स टाकून गार्निश करा.