Manasvi Choudhary
आज बहिण भावाच्या नात्याचा रक्षाबंधन हा सण आहे. मात्र अनेकांना कामाच्या गडबडीत, प्रवासामुळे किंवा इतर कारणांमुळे सकाळी रक्षाबंधन करायला जमले नाही.
अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, "जर सकाळची वेळ निघून गेली, तर संध्याकाळी किंवा रात्री कधी राखी बांधता येते का? संध्याकाळी राखी बांधण्याचा मुहूर्त काय? जाणून घ्या. Raksha Bandhan Evening Muhurat
रक्षाबंधन हा सणा प्रामुख्याने राखी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. या दिवशी पौर्मिमा असे पर्यंत तुम्ही भावाला राखी बांधू शकता.
रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी सकाळची शुभ वेळ 5.57 ते 9.48 ही होती मात्र अनेकांना कामाच्या धावपळीमुळे राखी बांधणे शक्य झाले नाही अशावेळी तुम्ही सांयकाळी राखी बांधू शकता.
ज्योतिषशास्त्रानुसार, आज पूर्ण दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधू शकता. फक्त राहूकाळ वेळी राखी बांधणे टाळावे.
संध्याकाळी भावाला राखी बांधण्यासाठी 05.11 ते संध्याकाळी 06.47 असा आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.