Manasvi Choudhary
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधून त्याच्या सुख-समृद्धीसाठी ओवाळतात.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला चामड्याची कोणतीही वस्तू गिफ्ट देणे किंवा सोबत नेणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक मानले जाते.
भावाने बहिणीकडे जाताना किंवा बहिणीने भावाला कोणतीही धारदार वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नये.
अनेकदा उपयोगाची वस्तू म्हणून रुमाल गिफ्ट दिला जातो, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार रुमाल किंवा काळ्या रंगाचे कपडे देणे टाळावे.
पांढरा रंग शांततेचा असला तरी सण-समारंभात पांढऱ्या रंगाची फुले किंवा वस्तू भेट देणे अशुभ मानले जाते.
आजकाल शोभेची रोपे गिफ्ट देण्याचा ट्रेंड आहे. परंतु, कॅक्टससारखी काटेरी झाडे किंवा शोभेची कोरडी झाडे भेट देणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.