Priya More
रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतुट नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.
जर तुम्हाला भाऊ-किंवा बहीण नसेल. तर तुम्ही चुलत बहीण-भाऊ, आत्या-मामांची मुलं यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा करू शकता.
जर तुम्हाला राखी बांधायला बहीण नाही तर तुम्ही आत्याकडून देखील राखी बांधून घेऊ शकता.
आत्या आपल्या भावाला आणि भाच्याला एकाच वेळी राखी बांधू शकते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे.
रक्षाबंधन सण साजरा करताना किंवा भावाला राखी बांधण्यापूर्वी बहिणी देवाला राखी बांधतात.
बहीण किंवा भाऊ नसेल तर तुम्ही तुमचे आराध्य दैवत, गणपती बाप्पा, कृष्णा, शंकर आणि हनुमान या देवांना राखी बांधू शकता.
ज्या मुलांना बहिणी नाहीत ते लक्ष्मी मातेच्या हस्ते राखी बांधू शकतात. यासाठी राखी देवीच्या चरणी ठेवून त्याची पूजा करा त्यानंतर ती मनगटावर बांधा
जर तुम्हाला बहीण किंवा भाऊ नसेल तर तुम्ही शेजारी राहणाऱ्या मुलगा किंवा मुलीसोबत रक्षाबंधन साजरे करू शकता.
ज्या मुलांकडे बहीण नाही ते मानलेल्या बहिणीकडून देखील राखी बांधू शकता आणि त्यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा करू शकता.