Shreya Maskar
यंदा रक्षाबंधन हा सण उद्या (शुक्रवार - २८ ऑगस्ट) ला आला आहे. एखादी बहीण काही कारणास्तव रक्षाबंधनाला आपल्या भावाला राखी बांधायला येऊ शकली नाही, तर बहिणीने पाठवलेली राखी कोणाच्या हातून बांधून घेणे शुभ मानले जाते, जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर बहीण रक्षाबंधनाला उपस्थित नसेल, तर चुलत बहीण, मावशी, आत्या भावाला राखी बांधू शकतात. या नात्यांमध्ये भावंडांमधील नात्याप्रमाणेच स्नेह, प्रेम आणि जवळीक असते.
राखीचा मूळ उद्देश भावाच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी, समृद्धीसाठी आणि संरक्षणासाठी शुभेच्छा देणे हा आहे. त्यामुळे, बहीण अनुपस्थित असताना, दुसऱ्या बहिणीने राखी बांधणे शुभ मानले जाते आणि हीच परंपरा देखील आहे.
अनेक कुटुंबांमध्ये मुली, भाच्यासुद्धा रक्षाबंधनाला आपल्या वडिलांना, काकांना, मामांना राखी बांधतात. जो व्यक्ती कायम आपले रक्षण करतो. आपल्या सुख दुःखातसोबत करतो त्याचा या दिवशी सन्मान केला जातो.
काही कुटुंबांमध्ये वहिनी आपल्या दीराच्या मनगटावर राखी बांधते. तसेच काही मित्र-मैत्रिणी देखील एकमेकांना रात्री बांधतात.
आजकाल ज्या घरात भाऊ नसेल त्या घरात बहिणी एकमेकांना राखी बांधतात. एकमेकांचे रक्षण करतात. आनंदाचे सण साजरे करतात.
रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचा धागा हा केवळ एक धागा नसतो. तो भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि एकजुटीच्या भावनेचे प्रतीक असतो. बहीण आपल्या भावाच्या सुखासाठी, समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ प्रत्येक परिस्थितीत तिचे रक्षण करण्याचे आणि तिला साथ देण्याचे वचन देतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.