Siddhi Hande
नवरात्रीत उपवास असतात. या काळात पौष्टिक अन्नपदार्थ खायचे असतात.
उपवासाला तुम्ही राजगिऱ्याची पुरी खाऊ शकतात. राजगिऱ्याचे अनेक फायदे आहे.
राजगिरा खाल्याने पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
राजगिऱ्याची पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकडून घ्या.
यानंतर बटाटे थंड करावेत. त्यानंतर बारीक करावेत.
यानंतर बटाट्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ मिक्स करावे. त्यानंतर छान मळून घ्या.
यानंतर पीठ १५ मिनिटे झाकून ठेवा.
या पीठाचे लहान गोळे करा. त्यानंतर पुरी लाटून घ्या.
एका बाजूला तेल गरम करा.त्यात पुऱ्या टाकून तळून घ्या.