Shreya Maskar
राजगिरा लाडू बनवण्यासाठी भाजलेले बदाम, राजगिरा, तीळ, कोको पावडर, खजूर आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
राजगिरा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम खजूरची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या.
त्यानंतर ड्रायफ्रूट्सचे छोटे काप करून घ्या.
आता एका बाऊलमध्ये ड्रायफ्रूट्स , खजूर पेस्ट, राजगिरा, तीळ, कोको पावडर घालून सर्व मिक्स करा.
शेवटी भाजलेले बदाम टाकून मिश्रण एकजीव करा.
मिश्रणाचे छोटे लाडू वळून घ्या.
हिवाळ्यात रोज एक राजगिरा लाडू खा आणि आपले आरोग्य जपा.
राजगिरामधील पोषक घटक शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.