Priya More
राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये अमृतसर येथे झाला होता. राजेश खन्ना यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
बॉलिवूडला १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे राजेश खन्ना हे पहिले सुपरस्टार होते. राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७१ या कालावाधीमध्ये लागोपाठ ७ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले होते.
राजेश खन्ना त्यांच्या फिल्मी करिअरसोबत लव्हलाइफमुळे नेहमी चर्चेत राहिले. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी होती.
लग्नानंतर डिंपल कपाडिया ११ वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर होत्या. मुली झाल्यानंतर डिंपल कपाडिया यांना चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा होती.
डिंपल यांनी चित्रपटात काम करू नये असे राजेश खन्ना यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला.
याचदरम्यान राजेश खन्ना यांचे नाव टीना मुनीम यांच्यासोबत जोडले गेले. त्याचवेळी त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
राजेश खन्ना आणि टीना मुनीम रिलेशनशीपमध्ये आल्यामुळेच राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे नातं तुटलं असल्याचे म्हटले जाते.
लग्नाच्या ११ वर्षानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे झाले. डिंपल आपल्या वडिलांच्या घरी मुलींसोबत राहत होत्या.
राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी २७ वर्षे वेगळं राहूनही एकमेकांना घटस्फोट दिला नव्हता.