Team India ने रचला आगळावेगळा इतिहास, २४ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

Nandkumar Joshi

रांची कसोटी

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे.

team india, Akash Deep, Ranchi Test Match | BCCI/X

आकाश दीपचं कसोटी पदार्पण

या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Akash Deep | @BCCI

टीम इंडियानं रचला इतिहास

आकाश दीप चौथा खेळाडू आहे, ज्याने इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या मालिकेत पदार्पण केलं आहे.

Akash Deep, Team India | BCCI / X

पाटीदार, जुरेल, सरफराजचं डेब्यू

याआधी या कसोटी मालिकेत रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान यांनीही आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

rajat patidar, Dhruv jurel, sarfaraz khan akash deep | BCCI/X

२४ वर्षांनंतर असं घडलंय

एखाद्या कसोटी मालिकेत चार भारतीय खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे.

Team India | bcci/x

२००० मध्ये टीम इंडियाकडून चौघांचे पदार्पण

याआधी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत मुरली कार्तिक, वसीम जाफर, मोहम्मद कैफ आणि निखिल चोप्रा यांनी पदार्पण केलं होतं.

mohammad kaif and nikhil chopra | File Photo/Google

चौथ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग ११

रांची कसोटीसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

Team india playing xi | BCCI / X

NEXT : बाबर आझमने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

Babar Azam | File Photo / google