Shreya Maskar
राज कचोरी बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, तूप, कांदा, तेल, बेसन, रवा आणि हिरवी मिरची इत्यादी साहित्य लागते.
राज कचोरीचे सारण बनवण्यासाठी काळे मीठ, हिंग, आलं पेस्ट, चाट मसाला, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, उकडलेले काळे चणे, मूग डाळ इत्यादी साहित्य लागते.
एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ, तूप, कांदा, तेल, बेसन, रवा आणि हिरवी मिरची मिक्स करून पाण्याच्या मदतीने कणीक मळा. त्यानंतर पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
यानंतर एका मोठ्या भांड्यात मूग डाळ भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाका. पॅनमध्ये तूप टाकून भिजवलेली मूग डाळ परतून घ्या.
त्यानंतर डाळ मिक्सरला वाटून घ्या. त्यात उकडलेले काळे चणे देखील जाडसर वाटून घ्या. मिश्रण जास्त जाड आणि बारीक होणार नाही याची काळजी घ्या.
आता वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात काळे मीठ, हिंग, आलं पेस्ट, चाट मसाला, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची घालून मिक्स करा.
आता गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून पुरी लाटून घ्या आणि खरपूस तेलात तळून घ्या. त्यानंतर पाणीपुरीला मध्यभागी फोडा त्यात तयार सारण टाकून मस्त भरून घ्या.
आता पुरीमध्ये दही, हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी, चाट मसाला पावडर, चिरलेली कोथिंबीर, कांदा, मीठ टाकून राज कचोरीचा आस्वाद घ्या.