Shreya Maskar
पोह्यापासून व्हेजिटेबल लॉलीपॉप बनवण्यासाठी भिजवलेले पोहे, बटाटा, गाजर, फरसबी, कोबी, मटार, कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, मीठ, आलं, हिरवी मिरची, चाट मसाला, गरम मसाला, चिली फ्लेक्स, पांढरे तीळ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
पोह्यापासून व्हेजिटेबल लॉलीपॉप बनवण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या बाऊलमध्ये भिजवलेले पोहे आणि मॅश केलेला बटाटा नीट मिक्स करा.
मिक्सरमध्ये कांदा, गाजर, फरसबी, कोबी आणि उकडलेले मटार जाडसर वाटून घ्या. भाज्यांची पेस्ट पोहे-बटाट्याच्या मिश्रणात टाका. तुमच्या आवडीच्या भाज्या यात मिक्स करा.
आता यात मीठ, आलं, हिरवी मिरची, चाट मसाला, गरम मसाला, चिली फ्लेक्स, कांद्याची पात आणि कोथिंबीर घालून सर्व घटक नीट एकजीव करा.
मिश्रणाचे छोटे गोळे तयार करून त्यावर स्टिक लावा. पांढरे तीळ एका ताटात पसरवून घ्या. त्यानंतर व्हेजिटेबल लॉलीपॉप त्यात चांगले घोळवा. तीळ सर्व लागू द्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात व्हेजिटेबल लॉलीपॉप खरपूस तळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.
तयार पोह्यापासून बनलेले व्हेजिटेबल लॉलीपॉप पुदिना चटणी किंवा सॉस यांच्यासोबत खा. लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल.
तुम्ही यात चीज, पनीर, उकडलेला मका, शेजवान चटणी देखील टाकू शकता. पदार्थ खूपच टेस्टी लागेल.