Shreya Maskar
पावसाळ्यात मित्रांसोबत वीकेंडला अलिबाग ट्रिप प्लान करा. अलिबागमध्ये समुद्रकिनारी मजा-मस्ती करून झाल्यावर जवळच असलेल्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्या.
उंदेरी किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर, अलिबाग जवळील 'थल' गावाच्या किनाऱ्यापासून सुमारे २ किमी अंतरावर वसलेला आहे.
उंदेरी किल्ला हा 'जयदुर्ग' नावानेही ओळखला जातो. हा १७ व्या शतकातील एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. उंदेरी किल्ला खांदेरी किल्ल्याचा जुळा किल्ला आहे.
उंदेरी किल्ला पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या दोन लहान टेकड्यांवर वसलेला असून, त्याला मजबूत तटबंदी आणि संरक्षणासाठी १२ बुरुज आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वारही आहे.
उंदेरी किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दींनी बांधला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जवळच असलेल्या खांदेरी बेटावर तटबंदी उभारून आपला वाढता सागरी प्रभाव निर्माण केला होता; त्याला शह देण्यासाठी एक मोक्याची सागरी चौकी म्हणून या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती.
या बेटावरून अरबी समुद्र आणि अलिबागच्या किनारपट्टीचे विहंगम दृश्य दिसते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे परदेशी पर्यटकही येतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.