Siddhi Hande
रोज नाश्त्याला पौष्टिक काय बनवायचा हा प्रश्नच असतो. तुम्ही लहान मुलांना आवडणाऱ्या डोसाला ट्विस्ट देऊ शकतात.
तुम्ही घरच्या घरी नाचणीचा पौष्टिक डोसा बनवू शकता. हा डोसा झटपट बनतो तसेच आरोग्यदायी असतो.
नाचणीचे पीठ,तांदळाचे पीठ, बारीक रवा, दही, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तेल
सर्वात आधी तुम्हाला भांड्यात नाचणीचे पीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र घ्यायचे आहे. त्यावर रवा मिक्स करा.
यानंतर या मिश्रणात कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं पेस्ट आणि मीठ टाका.
यानंतर मिश्रणात दही आणि थोडे पाणी टाकून मिक्स करा. हे पीठ घट्ट असू दे.
यानंतर हे मिश्रण १०-१५ मिनिटे भिजत ठेवा. जेणेकरुन रवा फुलेल.
यानंतर नॉन स्टिक पॅन गरम करा. त्यावर थोडे तेल टाका. यावर पीठाचे मिश्रण गोलाकार पसरवून घ्या.
यानंतर डोसा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
यानंतर हा डोसा तुम्हा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात.