Siddhi Hande
लहान मुलांना केक खूप जास्त आवडतो. परंतु बाहेरचा केक नेहमी देणे चांगले नसते.
तुम्ही घरीच नाचणीचा पौष्टिक केक बनवू शकतात. नाचणी- गुळाचा हा केक खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतात.
नाचणी पीठ, गव्हाचे पीठ, कोको पावडर, गूळ पावडर, बेकिंग सोडा, तेल, दूध, ड्रायफ्रुट्स
सर्वात आधी तुम्हाला एका बाउलमध्ये नाचणी आणि गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे. दोन्ही पीठ समान प्रमाणात घ्या.
यानंतर त्यात कोको पावडर टाकून हे सर्व मिश्रण मिक्स करा.
या मिश्रणात गूळ पावडर टाका. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर त्यानुसार गूळ पावडर टाका.
यानंतर त्यात थोडा बेकिंग सोडा टाका. वरुन चमचाभर तेल टाका.
या मिश्रणात दूध टाकून ते मिक्स करा. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जाड करु नये. त्यानुसार दूध अॅड करा.
यानंतर तुम्हाला एका वाटीत हे मिश्रण टाकायचे आहे. यावर कापलेले ड्रायफ्रुट्स टाका.
यानंतर कढई गरम करायला ठेवा. त्यात हा केक ठेवा. वरुन झाकण ठेवा. १०-१५ मिनिटे छान शिजू द्या.
यानंतर १५ मिनिटात झाकण काढून केक थंड होऊ द्या. त्यानंतर केक काढून तुम्ही खाऊ शकतात.