Shreya Maskar
हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्याला झटपट आंबोळी बनवा.
नाचणीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी नाचणीचे पीठ, भिजवलेली उडीद डाळ, गूळ, मीठ, मेथी दाणे, पोहे हे पदार्थ लागतात.
नाचणीच्या आंबोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम नाचणी, मेथीचे दाणे, भाजलेले पोहे मिक्सरला वाटून घ्या.
आता एका बाऊलमध्ये पिठाचे मिश्रण, उडीद डाळ, गूळ आणि मीठ घालून मिक्स करा.
हे पीठ आंबवण्यासाठी रात्रभर ठेवा.
सकाळी पॅनवर तेल टाकून या मिश्रणाची गोल आंबोळी भाजून घ्या.
तयार झालेली आंबोळी तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
नाचणीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे हेल्दी शरीरासाठी फायदेशीर आहे.