Shreya Maskar
रगडा बनवण्यासाठी पांढरे वाटाणे, बटाटे, कांदा, टोमॅटो आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
मीठ, हिंग, लसूण, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, धणे पूड, आमचूर पावडर, कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.
रगडा बनवण्यासाठी सर्वप्रथम पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी वटाणे, बटाटे, पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून उकडून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल, जिरे, हिंग, लसूण, आलं आणि हिरवी मिरची साहित्य घालून फोडणी द्या.
या मिश्रणात चिरलेला कांदा , टोमॅटो, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, धणे पूड आणि आमचूर पावडर घालून साहित्य एकजीव करा.
उकडलेले बटाटे आणि वाटाणे मॅश करून फोडणीत टाका.
शेवटी एक उकळी आल्यावर वरून कोथिंबीर भुरभुरून रगडा खाण्यासाठी तयार आहे.